Loading imageमा.आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत

मा. आमदार · शिक्षक मित्र

मा.आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत

पुणे विभाग शिक्षक मतदार संघ

  • प्रदेश सचिव: महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती
  • मुख्याध्यापक: जिजामाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आंबे ता. पंढरपूर
  • संस्थापक चेअरमन: सोलापूर जिल्हा माध्य. शाळा कृती समिती; मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह. पतसंस्था, पंढरपूर
  • मतदारसंघ: पुणे विभाग शिक्षक मतदार संघ

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्यालय, तनपुरे महाराज मठा शेजारी, पंढरपूर

9922094099, 7709100555
ऑफिस: +91 8975579057

datasawant121@gmail.com

मा. आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत, जुलै २०१४ मध्ये झालेल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांना विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये काम करता आले. विधान मंडळातील सर्व राजकीय पक्षाने तालिका सभापती म्हणून त्यांची निवड केली, त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या व शिक्षकांच्या प्रश्नावर शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडता आले. अजूनही अनेक प्रश्नावर त्यांचा पाठपुरावा चालू आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने त्यांचे प्रयत्न चालू आहेत.

शेतकरी कुटुंबातल्या सामान्य व कोणतेही राजकीय पाठबळ अथवा वारसा नसणाऱ्या कार्यकर्त्याला सहकाऱ्यांचे असं सच्च बळ मिळालं तर काय होऊ शकतं, याचं जागृत उदाहरण म्हणजे मा. आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत. शिक्षक पेशात काम करताना शिक्षण क्षेत्रातील उदासीनतेच्या प्रश्नाने त्यांचे जीवन प्रश्नार्थक होते. आंतरिक तळमळ व कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ घेऊन त्यांनी शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नावर When, Why, Where, What, Who या पाच प्रश्नांचा सातत्याने वापर केला.

आमदार होण्यापूर्वी त्यांनी रस्त्यावरचा लढा उभारून विविध आंदोलने, उपोषणे करून ६०,००० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर करून घेतले. विविध आंदोलने व उपोषणे करून ४१,१५३ कर्मचारी बांधव-भगिनींना वेतन अनुदान मंजूर करून देण्यात आमदार साहेब यशस्वी झाले आहेत.

आमदार साहेब दररोज किमान १६ ते १८ तास काम करत असतात. शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे, आझाद मैदान मुंबई, संचालक कार्यालय, विधानभवन मुंबई येथे आंदोलने व उपोषणे करून अनेक विषय मार्गी लावले आहेत. अनेक वर्षांपासून बंद असलेले शाळांचे वेतनेतर अनुदान मिळवून दिले आहे. सर्व शाळांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला मिळविण्यासाठी शासन आदेश पारित करून घेतला आहे. वैद्यकीय बिले कॅशलेस योजनेतून मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत.

आमदार साहेबांनी केलेल्या कामांची यादी

  1. १ ते ११ डिसेंबर २०१५: हजारो शिक्षकांसोबत संत नगरी शेगाव ते नागपूर २८७ किमी पायी दिंडी; मुक्कामी «भीक मागो» आंदोलन.
  2. १ ते ४ जून २०१६: विनाअनुदानित कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आयुक्त कार्यालय, पुणे येथे आमरण उपोषण (किडनीवर कायमचा परिणाम झाला तरी लढा चालू).
  3. १७ ते २३ जुलै २०१७: मुसळधार पावसात भिडे वाडा, पुणे ते शिक्षण मंत्री सेवासदन, मुंबई १६५ किमी पायी दिंडी.
  4. २३ ऑक्टोबर २०१७ चा कठीण अटींचा शासन आदेश अधिक्रमित करून वरिष्ठ व निवड श्रेणी देण्याचा आदेश करून घेतला.
  5. १२ ते १६ डिसेंबर २०१९: १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी वर्धा ते नागपूर ८१ किमी दिंडी.
  6. १ नोव्हेंबर २००५ नंतर नेमणुकीसाठी जुनी पेन्शन — सर्व विभाग एकत्र; विधानभवन स्तरावर पाठपुरावा चालू.
  7. आश्रमशाळेतील शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू करून घेतला; वैद्यकीय प्रतिपूर्ती शालेय शिक्षण प्रमाणे; १४८ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन शेगाव–नागपूर दिंडीने सुरू करून घेतले.
  8. १०-२०-३० श्रेणी वाढीसाठी कमिटी नेमण्यास भाग पाडले.
  9. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्तांसाठी DCPS/NPS मध्ये शासन हिश्श्याची तरतूद करण्यास शासनास प्रवृत्त केले.
  10. ५ मार्च २०२०: वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या संपकालातील ७१ दिवसांच्या वेतनाबाबत लक्षवेधी; मंत्र्यांकडून आश्वासन.
  11. कोल्हापूर, सांगली, सातारा पूरग्रस्त ३०० शाळांना व विद्यार्थ्यांना ₹४० लाखांचे शैक्षणिक साहित्य — «बांधिलकी सामाजिकतेची, लढा शिक्षणाचा».

संदर्भ: dattatraysawant.com/info.html